सांगली : भोसे येथे तीन वाहनांच्या विचित्र अपघातात अकरा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत

0
2

सांगली : तीन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात एका अकरा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला. भोसे (ता. मिरज) सोमवारी दुपारी झालेल्या या अपघातानंतर संतप्त जमावाने एका वाहनावर दगडफेक करून काचा फोडल्या. सदरचा अपघात हा रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर झाला.

याबाबत माहिती अशी, ट्रॅक्टर (एमएच १० डीव्ही ०६८९) हा सांगोल्याकडून मिरजेकडे येत होता. याचवेळी याच मार्गाने पॅगो रिक्षाही (एमएच ११ एजी २५८७) येत होती. रिक्षामधून पाच जणांचे कुटुंब प्रवास करत होते. पॅगो रिक्षाला मागून आलेल्या मिनी टेम्पोने (एमएच ११ बीएल ६१६५) धडक दिली. यामुळे पॅगो रिक्षातून प्रवास करत असलेला अमित शुभांगी जगन्नाथ पवार (वय १० रा. गोपाळवस्ती, अजिंठा चौक,सातारा) हा खाली रस्त्यावर पडला. या दरम्यानच मागून आलेल्या मिनी टेम्पोचे चाक त्याच्या डोकीवरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर घटनास्थळी लोकांची गर्दीही जमली. लहान मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून जमाव संतप्त झाला. संतप्त जमावाने मिनी टेम्पोवर दगडफेक करत वाहनाचे नुकसानही केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here