
कविश मजुमदारने या चित्रपटात लहानपणीच्या हृतिक रोशनची भूमिका साकारली होती. तोच लड्डू आता मोठा झाला आहे. करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ हा बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये शाहरुख खान, काजोल, जया बच्चन, अमिताभ बच्चन, करीना कपूर हृतिक रोशन यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय चित्रपटातील बालकलाकारांनीही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं.
या चित्रपटात लहानपणीच्या करीनाची (पू) भूमिका अभिनेत्री मालविका राजने साकारली होती. तर हृतिकच्या (लड्डू) लहानपणीची भूमिका कविश मजुमदारने साकारली होती. लड्डूची भूमिका प्रेक्षकांना फार आवडली होती. तोच लड्डू आता मोठा झाला आहे.
‘कभी खुशी कभी गम’मधील या ‘लड्डू’ला आता ओळखणंच कठीण आहे. कविशने ‘पार्टनर’, ‘गोरी तेरे प्यार में’, ‘मैं तेरा हिरो’ आणि ‘बँकचोर’ या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. इन्स्टाग्रामवर तो फारसा सक्रिय नसतो.
कविश हा अभिनेता वरुण धवनचा खास मित्र आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैं तेरा हिरो’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. कविशचा जन्म 18 जुलै 1995 रोजी झाला. त्याने ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर काम केलं.
कविशचे इन्स्टाग्रामवर सहा हजारांवर फॉलोअर्स आहेत. त्याने अकाऊंटवर स्वत:चे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये कविशचं ट्रान्सफॉर्मेशन सहज पहायला मिळतंय.