
बिना व्यक्त होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांच माध्यम म्हणजे पुणेरी पाटी. पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. एक पाटी सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ही पाटी वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.
लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. अशातच चोर बंद असलेल्या घरावरही लक्ष ठेवून असतात. मात्र एका पुणेकरानं बंद असलेल्या आपल्या बंगल्याबाहेर एक पाटी लावली आहे. ही पाटी वाचून कोणीही या बंगल्यात जाण्याचा विचार करणार नाही. ही पाटी वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.
आता तुम्ही म्हणाल असं लिहलंय तरी काय? तर या बंगल्याबाहेर लावलेल्या पाटीवर “बंगला रिकामा आहे, चोरण्यासारखे काहीही नाही. विनाकारण कष्ट घेऊ नयेत.”
पहा पोस्ट :