राजस्थानचा पहिला विजय चेन्नईवर सहा धावांनी मात : नितीश राणा सामनावीर

0
53

माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : राजस्थान रॉयल्सने अखेर विजयाचं खातं उघडलं आहे. राजस्थानने सलग 2 सामने गमावल्यानंतर घरच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळताना पहिला विजय मिळवला आहे. राजस्थानने चेन्नईला गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार ऋतुराज गायकवाड याने 63 धावांची खेळी केली. त्यामुळे चेन्नईला विजयाची आशा होती. मात्र रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी ही जोडी अखेरच्या क्षणी चेन्नईला विजयी करण्यात अपयशी ठरली. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांना विजयाची आशा होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 176 धावाच करता आल्या.

 

राजस्थानच्या यशस्वी व संजू सॅमसन या सलामी जोडीने सुरुवात केली. या सामन्यात यशस्वी पुन्हा एकदा अपयशी ठरला. ४ धावा करून तो खलीलची शिकार ठरला. संजू सॅमसनने १६ चेंडूत २० धावा केल्या. त्याला नूर अहमदने त्याला बाद केले. त्यानंतर खेळाची सर्व सूत्रे नितीश राणाने आपल्या ताब्यात घेतली. याने 36 चेंडूत 81 धावा केल्या. नितीशने या खेळीत 10 चौकार आणि 5 षटकार लगावले. कर्णधार रियान पराग याने 28 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह 37 रन्स केल्या. या चौघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. यशस्वी जयस्वाल आणि वानिंदु हसरंगा या दोघांनी प्रत्येकी 4 धावा केल्या. ध्रुव जुरेलने 3 रन्स केल्या. तसेच चेन्नईकडून तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. चेन्नईसाठी खलील अहमद, नूर अहमद आणि मथीशा पथीराणा या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर रवींद्र जडेजा आणि जेमी ओव्हरटन या दोघांनी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

 

चेन्नईने धावांचं खातं उघडण्याआधी विकेटचं खातं उघडलं. रचीन रवींद्र झिरोवर आऊट झाला. त्यानंतर राहुल त्रिपाठी 23 धावांवर बाद झाला. त्यामुळे चेन्नईची 2 बाद 46 अशी स्थिती झाली. त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे या दोघांनी चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्णधार रियान पराग याने अप्रतिम कॅच घेत शिवम दुबे याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. रियान परागने शिवमचा घेतलेला कॅच निर्णायक ठरला. शिवम 18 धावांवर बाद झाला. राजस्थान चेन्नईला ठराविक अंतराने झटके देतच होती. शिवमनंतर विजय शंकर 9 रन्स करुन माघारी परतला. मात्र ऋतुराजने एक बाजू धरुन ठेवली होती. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांना आशा होती. मात्र ऋतुराज गायकवाड हा देखील ऐन क्षणी आऊट झाला. ऋतुराजने 44 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 63 धावा केल्या.

 

धोनी मैदानात आला तेव्हा चेन्नईला विजयासाठी 25 बॉलमध्ये 54 धावांची गरज होती. तर रवींद्र जडेजा मैदानात होता. त्यामुळे ही अनुभवी जोडी चेन्नईला विजयी करेल, अशी आशा होती. मात्र या दोघांना तसलं काही जमलं नाही. धोनी 20 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर 16 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतरही चेन्नईला विजयाची संधी होती. मात्र अखेर राजस्थान चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 176 रन्सवर रोखण्यात यशस्वी ठरली. रवींद्र जडेजा 22 बॉलमध्ये 32 रन्सवर नॉट आऊट परतला. तर जेमी ओव्हरटन 11 धावांवर नाबाद परतला. राजस्थानसाठी वानिंदू हसरंगा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्मा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

फोटो : नितीश राणा
बातमीत फोटो कट करून लावणे


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here