
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका तसेच आमदार गोपीचंद पडळकर आणि समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते यांचे वतीने जत विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल तसेच नुकतेच शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर या ठिकाणी खेचून आणल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर तसेच समाज कल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांचा आज दिनांक ०१ एप्रिल रोजी नागरी सत्कार सोहळा विटा येथील चौंडेश्वरी चौक, लेंगरे रोड विटा येथे आयोजित करण्यात आला आहे.
आम. गोपीचंद पडळकर हे जत विधानसभा मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. तसेच विधानसभेत त्यांनी आक्रमक होत शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापूर येथे व्हावे, अन्यथा मोठा संघर्ष निर्माण होवू शकतो असे ठणकावून सांगितले होते.
विधानसभेत यावर उत्तर देताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आम. पडळकर यांच्या मागणी बाबत खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र करण्याची घोषणा केली. तसेच विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी देखील सातत्याने पाठपुरावा केला होता.
त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर व माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर या पडळकर बंधूंचा नागरी सत्कार विटा येथे आज दिनांक ०१ एप्रिल रोजी सांयकाळी ६.०० वाजता संपन्न होणार असून सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.