
आम. सुहास बाबर : आळसंद प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन रुग्णवाहिकाचे उद्घाटन
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा : नवीन रुग्णवाहिकेमुळे आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक तत्परतेने आणि प्रभावीपणे रुग्णांपर्यंत पोहोचू शकणार असल्याचे प्रतिपादन आम. सुहास बाबर यांनी व्यक्त केले. आरोग्य सेवेच्या सुदृढीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत, जिल्हा नियोजन समितीतून प्राथमिक आरोग्य केंद्र विटा, आळसंद साठी मंजूर झालेल्या नवीन रुग्णवाहिकाचे उद्घाटन व पूजन मोठ्या उत्साहात आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्याला मान्यवर तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
पुढे बोलताना ते म्हणाले, “ही रुग्णवाहिका तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी मोलाची ठरेल. मतदार संघात आरोग्याच्या दृष्टीने रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्यसेवा पुरवणे ही आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यावेळी प्रकाश बागल, रवी जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बाबर, वैद्यकीय अधिकारी आळसंद डॉ.लवटे, डॉ. हंगरगी व सर्व प्रा.आ.केंद्र अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.