राष्ट्रीयताज्या बातम्या

‘आईस्क्रीम मॅन’ अशी ओळख असणारे नॅचरल्स आईस्क्रीम कंपनीचे संस्थापक यांचे निधन

रघुनंदन कामत पावभाजी विकत होते आणि तसेच साइडला आईस्क्रीमची ऑफर करत असायचे.

माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : ‘आईस्क्रीम मॅन’ अशी ओळख असणारे नॅचरल्स आईस्क्रीम कंपनीचे संस्था पक रघुनंदन श्रीनिवास कामत यांचे काल शुक्रवारी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. रघुनंदन श्रीनिवास कामत यांच्याीवर मुंबईतील एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात उपचार सुरु होते. १७ मे रोजी रात्री त्यां नी अखेरचा श्वास घेतला.

रघुनंदन यांचे वडील फळविक्रेता होते. त्यांिनी आपल्या वडिलांना फळांच्या व्यवसायात मदत केली. त्याळमुळे फळांबद्दल त्यांेना सखोल माहिती मिळण्याास मदत झाली. वयाच्या् १४ व्या वर्षी मंगळूर या मूळ गावातून ते मुंबईत आले.

14 फेब्रुवारी 1984 रोजी त्यांनी चार कर्मचाऱ्यांच्या टीमसह आईस्क्रीमच्या व्यवसायात पाऊल टाकले, काही मूलभूत घटक आणि नैसर्गिक आइसक्रीम या ब्रँडचा जन्मर झाला. कंपनी सुरू झाली तेव्हा तिने फक्त 12 फ्लेवर्स ऑफर केले, रघुनंदन यांच्या वडिलांसोबत फळ व्यवसायातील अनुभवातून विकसित झाले. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी, त्यांनी पावभाजीसह साइड डिश म्हणून आइस्क्रीम विक्री केली. पहिल्याच वर्षी, जुहू येथील त्यांच्या छोट्याशा दुकानातून 5 लाख रुपयांची कमाई करण्यात यश आले. यानंतर त्यां नी मागे वळून पाहिले नाही. ‘नॅचरल्स आईस्क्रीम’चे 2020 पर्यंत देशभरात 135 आउटलेट होते.

रघुनंदन कामत पावभाजी विकत होते आणि तसेच साइडला आईस्क्रीमची ऑफर करत असायचे. यामुळे सगळे त्यांच्या बाजूने वळले आणि अनेक ग्राहक आकर्षित झाले. नॅचरल्स आईस्क्रीमने जसजशी लोकप्रिय होत गेली, कामत यांनी फक्त आईस्क्रीम व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर त्यांनी नवीन उत्पादने करण्यात सुरुवात केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button