आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी बाजार समितीच्या आंबा महोत्सवाचे उद्घाटन काँग्रेस नेते विशाल पाटील व युवा नेते जितेश कदम यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, उपसभापती राहूल गायकवाड यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले, आटपाडी बाजार समितीचे काम चांगले असून भविष्यात बाजार समितीला आवश्य मदत करू. बाजार समितीचे वतीने शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल याकडे लक्ष देवून काम करावे. तसेच बाजार समितीने राज्यात नावलौकिक मिळवावा अशी अपेक्षा देखील त्यांनी आटपाडी सभापती संतोष पुजारी, उपसभापती राहुल गायकवाड व संचालक मंडळ यांच्याकडे व्यक्त केली.
यावेळी युवा नेते जितेश कदम यांच्यासह डी.एम. पाटील. प्रदीप पाटील, जयदीप भोसले यांच्यासह बाजार समितीचे संचालक, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, विविध गावाचे सरपंच, उपसरपंच यांच्या शेतकरी, व्यापारी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते.
दीड किलोला आंबा विशाल पाटील यांना भेट
आंबा महोत्सवामध्ये दीड किलो वजनाचा वनराज आंबा या महोत्सवाचे खास आकर्षण होते. आटपाडीतील माणदेश उद्योग समूहाचे गुलाबराव पाटील व श्रेयस पाटील यांच्या बागेमध्ये तब्बल दीड किलो वजन असलेले वनराज आंबे यावेळी विशाल पाटील यांना भेट देण्यात आले.