आटपाडी : देशमुख महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाला एनसीसीची मान्यता

0
11

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/ प्रतिनिधी : दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयातील कनिष्ठ विभागामधील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता ११ वी व १२ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सांगली यांचेकडून एनसीसीसाठी मान्यता मिळाली आहे.

एनसीसीसाठी विद्यार्थ्यांची मागणी विचारात घेऊन एनसीसी अधिकारी प्रा. विजय शिंदे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याबाबत संस्थेचे चेअरमन अमरसिंह देशमुख व संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले यांनी १६ महाराष्ट्र बटालीयन एनसीसी सांगलीचे कमांडिंग ऑफिसर चंद्रशेखर साठे, ॲडम ऑफिसर अभिजीत बर्वे इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

या मान्यतेमुळे आटपाडी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी एनसीसीद्वारे लष्करी सेवेची सुरवात करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले यांनी केले आहे.