अभिमानास्पद! महाराष्ट्रातील ‘हे’ शहर ठरल जगातील सर्वात जास्त अब्जाधिश असलेलं शहर, बीजिंगला टाकलं मागे

0
3876

आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून (Mumbai) एक मोठी बातमी आहे. मुंबई शहरानं मोठी कामगिरी केली आहे. मुंबई हे आता जगातील सर्वात जास्त अब्जाधिश असलेलं शहर (city of billionaires) बनलं आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 (Hurun Rich List 2024) च्या अहवालानुसार मुंबईनं आता चीनची राजधानी बीजिंगलाही (Beijing) मागे टाकले आहे. यापूर्वी बीजिंग हे जगातील सर्वात जास्त अब्जाधिश असणाऱ्यांचं शहर होतं. आता मुंबईनं बीजिंगला मागं टाकत हा मान पटकावला आहे.

बीजिंगमध्ये वर्षभरात अब्जाधिशांच्या संख्येत लक्षणीय घट
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, बीजिंगमध्ये वर्षभरात अब्जाधिशांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. जवळपास 28 टक्क्यांची घट झाली आहे. मागील एका वर्षात मुंबईतील श्रीमंतामध्ये 58 नव्या अब्जाधिशांची भर पडली आहे. यामुळं शहराची एकूण संपत्ती ही 47 टक्क्यांनी वाढली आहे. अलिकडच्या काळात मुंबईत अब्जाधिश असणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळं मुंबई जगाती सर्वात जास्त अब्जाधिश असणाऱ्या लोकांचं शहर झालं आहे. यामुळं मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून जगात नावलौकीक झाला आहे.

भारतात सर्वात जास्त अब्जाधिश असणारी 10 शहरं कोणती?
मुंबई – 365
नवी दिल्ली – 217
हैदराबाद – 104
बुंगळुरु – 100
चेन्नई – 82
कोलकाता – 69
अहमदाबाद – 67
पुणे – 53
सुरत – 28
गुरुग्राम – 23

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here