लोकप्रिय मालिका ‘शाका लाका बूम बूम’ फेम अभिनेत्याने उरकला साखरपुडा,कोण आहे हि मुलगी?

0
318

‘शाका लाका बूम बूम’ फेम संजूने त्यांच्या मॅजिक पेन्सिलने 90 च्या दशकातील मुलांचं बालपण आणखी खास केलं. आता अभिनेत्याला ओळखणं देखील कठीण झालं आहे.सध्या किंकूश त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याने साखरपुडा केला. साखरपुड्याने फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट देखील केले आहेत. फोटोमध्ये त्याने होणाऱ्या पत्नीचा चेहरा दाखवलेला नाही.

किंकूश यांच्या होणाऱ्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर, तिचं नाव दिक्षा नागपाल असं असून ती एक कोरिओग्राफर आहे. सध्या त्यांच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल होत आहेत.अभिनेत्याच्या साखरपुड्याच्या फोटोंवर सेलिब्रिटी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अभिनेता शाहिर शेख म्हणाला, ‘ओएमजी… शुभेच्छा भाई’ फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.सांगायचं झालं तर, दिक्षा हिच्याआधी अभिनेत्याने शिव्या पठानिया हिला देखील डेट केलं आहे. अनेक वर्ष दोघे रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here