क्रिकेट खेळताना तरुणाला बॅटने मारहाण, तरुणाचा जागीच मृत्यू,पहा व्हिडीओ

0
818

 

काश्मीर येथील नौगामच्या मदंखा परिसरात स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. क्षुल्लक कारणावरून वाद झाला. भांडणानंतर क्रिकेटच्या बॅटने तरुणाला मारहाण केले. या मारहाणीत तरुणांचा जागीच मृत्यू झाला असा दावा करणारा पोस्ट व्हायरल होत आहे. या घटनेमुळे गावात संताप व्यक्त केला जात आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, मित्रांसोबत क्रिकेट खेळणे एका तरुणाच्या जीवाशी बेतले आहे. क्रिकेट सामन्यात झालेल्या वादात तरुणाला बॅटने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तरुणाने आपला जीव गमावला आहे असा एक पोस्ट सद्या व्हायरल होत आहे. श्रीनगर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आणि दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.

 

पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेसंदर्भात पोलिसांनी माहिती दिली की,  पीडित जीवंत आहे. त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणात आणखी दोन आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. तरुणांने मित्राला का मारले हे अद्याप समजू शकले नाही. याचा पुढील तपास सुरु झाला आहे.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here