दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

0
73

 

इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून यंदा दहावीचा निकाल 36.78 टक्के तर बारावीचा निकाल 32.46टक्के लागला आहे. इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा 16जुलै ते 30 जुलै 2024 च्या काळात घेण्यात आली असून राज्यातील काही जिल्ह्यांत 26 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. त्या दिवशी घेतली जाणारी परीक्षा 31 जुलै रोजी घेण्यात आली.

राज्यातील 9 विभागीय मंडळाकडून 32 हजार 386 विद्यार्थांनी नोंदणी केली. त्यापैकी31 हजार 270विद्यार्थी परीक्षेला बसले. या परीक्षेत 11हजार हुन अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 6 ऑगस्ट मध्ये झाली 26 जुलै ची परीक्षा 9 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. राज्यातील 9 विभागीय मंडळामधून विज्ञान, कला, वाणिज्य आणि एचएससी व्होकेशनल शाखेतून 60 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.त्यापैकी 59 हजार विद्यार्थी परीक्षेत सम्मिलीत झाले.19 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here