लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांचा ‘एक डाव भुताचा’, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0
128

मराठी सिनेसृष्टीत मकरंद अनासपूरे , सिद्धार्थ जाधव हे अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या कॉमेडीच्या टायमिंगने प्रेक्षकांना पोट धरून हसवणारे हे अभिनेते आपल्या धीरगंभीर भूमिकेनेदेखील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. अष्टपैलू अभिनेते मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव ही जोडगोळी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव हे आता ‘एक डाव भुताचा’ मांडणार आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

“एक डाव भूताचा” या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपूरे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव एकत्र आले असून, येत्या 4 ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले. सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपूरे एकत्र म्हणजे पुरेपूर मनोरंजनाची हमी हे त्यांनी आजवर अनेकदा दाखवून दिलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्येही त्याचंच प्रतिबिंब दिसतं. एकंदरीत चित्रपटाचे पोस्टर पाहता टॉम अँड जेरीसारखा खेळ या चित्रपटात पाहायला मिळण्याचा अंदाज बांधता येतो. या चित्रपटात मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

चित्रपटात कोणते कलाकार?
चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले, अक्षय कुलकर्णी,हर्षद नायबळ अभिनेत्री मयूरी देशमुख,अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते,रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटेने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे.
डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी पार पाडली आहे.

पहा पोस्ट:

instagram.com/p/C_SF14VJ_MT

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here