कॅबची AUDI Q3 ला धडक, ओला ड्रायव्हरला बेदम मारहाण,पहा व्हिडीओ

0
406

घाटकोपर परिसरात एका ओला ड्रायव्हरला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी एका दामप्त्यावर गुन्हा दाखल केला. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या मारहाणीत ड्राव्हयरला गंभीर दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर येथील पार्कसाइट परिसरात एका ओला ड्रायव्हरला मारहाण केले. घाटकोपर येथील रहिवासी ऋषभ बिभाष चक्रवर्ती आणि त्यांची पत्नी अंतरा यांनी मारहाण केले. पोलिसांनी या दोघांवर घाटकोपर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, ड्रायव्हरने चक्रवर्ती यांच्या AUDI Q3 कारला धडक दिली. याधडकेत त्यांच्या कारचे नुकसान झाले. ही घटना कुरेशी घाटकोपरच्या असल्फा भागात गाडी चालवत असताना घडली.

या घटनेनंतर संतापलेल्या जोडप्यांनी ड्रायव्हरशी वाद घालण्यास सुरुवात केली. कारमधून बाहेर पडून ड्रायव्हरला मारहाण केली. ऋषभ यांनी ड्रायव्हरला उचलून जमिनीवर फेकल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना गुरुवारी तात्काळ जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारहाणीनंतर दोघे जण घटनास्थळावरून फरार झाले.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या दोघांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 35 (3) अंतर्गत गुन्हा दाखल केला. चक्रवर्तीला शुक्रवारी पोलिस ठाण्यात बोलावले असून तेथे तपास अधिकारी त्यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवतील.

पहा व्हिडीओ: