‘या’ उद्योगपतीने मुकेश अंबानींनाही टाकलं मागे! ठरला भारताचा सर्वात श्रीमंत व्यक्ती

0
871

मुकेश अंबानी ही भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचे हे प्रथम क्रमांकाचे स्थान अबाधित होते. मात्र आता मुकेश अंबानी आता भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती राहिलेले नाहीत. त्यांना भारतातील दिग्गज उद्योजक गौतम अदाणी यांना मागे टाकलं आहे. म्हणजेच हुरुन श्रीमंतांच्या यादीनुसार (2024 Hurun India Rich List) गौतम अदाणी हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. या यादीनुसार श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून समोर आल्यानंतर पर्यायाने गौतम अदाणी आशिया खंडातील श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

देशात प्रत्येक पाच दिवसांत एक अब्जाधीश
हुरुन इंडिया रिच 2024 या यादीनुसार श्रीमंतांच्या या यादीत एकूण 1,539 श्रीमंतांचा समावेश आहे. या सर्व श्रीमंतांची संपत्ती ही 1 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. 31 जुलै 2024 पर्यंतच्या डेटानुसार हुरून श्रीमंतांची यादी तयार करण्यात आलेली आहे. या यादीनुसार भारतात गेल्या वर्षभरात प्रत्येक पाच दिवसांत एक अब्जाधीश झालेला आहे.

गौतम अदाणी यांची संपत्ती नेमकी किती?
हुरुन इंडिया रिच 2024 च्या यादीनुसार 62 वर्षीय गौतम अदाणी 1 लाख 61 हजार 800 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर या यादीनुसार श्रीमंतीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुकेश अंबानी यांची संपत्ती 1,014,700 कोटी रुपये आहे. या यादीच्या तिसऱ्या स्थानी एचसीएल शिव नादार आहेत. त्यांची संपत्ती 314,000 कोटी रुपये आहे. या यादीत पाचव्या स्थानी सन फार्माचे दिलीप सिंघवी आहेत. त्यांची संपत्ती 249,900 कोटी रुपये आहे.

श्रीमंतांच्या यादीत शाहरुख खानचाही समावेश
हुरुन इंडिया रिच 2024 च्या यादीत प्रसिद्ध अभिनेत्रा शाहरुख खानचाही समावेश करण्यात आला आहे. शाहरुख हा अब्जाधीश असून त्याची एकूण संपत्ती 7300 कोटी रुपये आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रेड चिलीज एंटरटेन्मेंट या दोन कंपन्यांत असलेल्या हिस्सेदारीमुळे शाहरुख खान अब्जाधीश म्हणून समोर आला आहे. या यादीत शाहरुखसह अमिताभ बच्चन, चुही चावला आणि कुटुंब, करण जोहर, ऋतिक रोशन यांचाही समावेश आहे.

पहा पोस्ट :

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here