खरसुंडी यात्रेच्या बंदोबस्तातील पोलीस मित्र स्वयंसेवकांचा सन्मान

0
298

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : खरसुंडी (ता. आटपाडी) : येथील प्रसिद्ध श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त बंदोबस्तासाठी कार्यरत असलेल्या पोलीस मित्र संघटनेच्या स्वयंसेवकांचा आटपाडी पोलीस ठाण्याच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

 

यात्रेदरम्यान शिस्तबद्ध बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि अनुशासन राखण्यात पोलीस मित्र स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या सेवाभावी योगदानाची दखल घेत आटपाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

 

शिस्तबद्ध व सुरक्षित यात्रा घडवून आणण्यासाठी पोलीस विभागासोबत स्वयंसेवकांनी दिलेले सहकार्य उल्लेखनीय असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आटपाडीचे पोलीस निरीक्षक विनय बहीर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजेंद्रसिंह बायस, पोलीस उपनिरीक्षक अमोल थोरात, महिला पोलीस अंमलदार सुजाता जगदाळे यांचे हस्ते पोलीस मित्रांचा सन्मान करण्यात आला.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here