बारावी बोर्ड परीक्षेत देशमुख महाविद्यालयाचे यश

0
189

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचा बारावी बोर्डचा कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा एकत्रित निकाल ९१ टक्के लागला असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले यांनी दिली.

 

कला शाखेचा निकाल 76 टक्के लागला असून यामध्ये कु. विद्या पुण्यवंत सरक हिने 87.33 टक्के गुण मिळवत तालुक्यात व संस्थेत प्रथम क्रमांक व कु. साक्षी युवराज भोसले हि ८६.५० टक्के गुण मिळवत तालुक्यात दुसरा व कु.पूजा संतोष काळे हिने ७७.५० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.

 

वाणिज्य शाखेचा निकाल 94.58 टक्के लागला असून, कु. मयुरी दत्तात्रय माने, कु.सई चेतन जाधव, कु. सृष्टीश्री अनिल लांडगे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. विज्ञान शाखेचा निकाल 96.61 टक्के लागला असून, कु. राधिका हरीदार घोडके, कु. ऋतुजा संतोष पवार, कु. शर्वरी दिलीप सुर्वे यांनी अनुक्रमे क्रमांक प्राप्त केले.

 

यशस्वी विद्यार्थ्यांचे दि. आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अमरसिंह देशमुख, सचिव एच.यु. पवार, निरीक्षक ए.के.गायकवाड, निरिक्षक पी.जी नामदास, निरीक्षक ए.बी.चौगुले, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले, सर्व मार्गदर्शक शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, प्राध्यापिका, प्रशासकीय कर्मचारी व सेवक यांनी अभिनंदन केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here