
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : दिघंची येथील इंद्रभाग्य कृषी व ग्रामीण विकास संस्था संचलित पद्मिनी कॉलेज ऑफ फार्मसी येथील बी फार्मसी व डी फार्मसी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा मेडिसिनल गार्डनमध्ये प्रात्यक्षिक भेटेचा कार्यक्रम खडूस येथील मेडिसिनल गार्डनमध्ये घेण्यात आला.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना वैद्यकीय वनस्पतींचे प्रत्यक्ष निरीक्षण करता आले. त्याचा उपयोग, शास्त्रीय नावं, औषधी गुणधर्म आणि लागवडीच्या पद्धती समजून घेता आल्यामुळे विद्यार्ध्यांच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे.
तसेच या अभ्यासू भेटीमुळे औषधी वनस्पतींची ओळख, वनस्पतींची वैज्ञानिक आणि सामान्य नावं, त्यांचे उपयोग विद्यार्थ्यांना समजावणे, फायटोकिमिकल्सचा अभ्यास, वनस्पतीत असलेल्या औषधी घटकांबद्दल माहिती देणे, औषधी भाग ओळखणे, मुळे, पाने, बिया, साल, फळ यामधून औषध तयार होणाऱ्या भागांची ओळख, लागवड व देखभाल, मेडिसिनल प्लँट्स कशी लावायची व त्यांची निगा कशी राखायची हे शिकणे, उद्योगाशी जोड औषधी वनस्पतींचा औद्योगिक उपयोग समजणार आहेत.
डिग्री विभागामधून प्रा. शिवानी ऐवळे, लॅब टेक्निशियन ओंकार मेथवडे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सदिच्छा भेटीमध्ये सहभाग घेतला. यावेळी इंद्रभाग्य कृषी व ग्रामीण विकास संस्थेचे संचालक ईश्वरराव मोरे पाटील व संचालिका स्वातीताई मोरे-पाटील यांनी या मेडिसिनल गार्डन भेटी साठी मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमित पानसकर डिग्री विभागांच्या विभागप्रमुख तथा प्राचार्या डॉ. भाग्यश्री पानसकर आणि डिप्लोमा विभाग प्रमुख प्राध्यापक दिनेश शिंगाडे, एम.फार्मसी विभाग प्रमुख विभाग प्रमुख डॉ. कोत्रेश यालिगर आणि डॉ.बोयापती मधुलता या सर्वांच्या सहभाग व प्रयत्नातून मेडिसिनल गार्डन भेट यशस्वीरित्या पार पडली.