
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील हाकेवाडी येथे पती-पत्नी व मुलीला लोखंडी सळईने मारहाण झाल्याची घटना घडली असून सदर प्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत यातील फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी साहेबराव तुकाराम हाके यांची हाकेवाडी येथे शेतजमीन आहे. सदर शेतजमिनीचा न्यायालयात दावा दाखल आहे. असे असताना यातील आरोपी अतुल बळवंत हाके, नितेश बळवंत हाके, नाना आप्पा गवंड, विद्या नितेश हाके यांनी फिर्यादीच्या शेतजमीन गट नं. २९८५ मध्ये असलेल्या घास गवत व मका पिकाचे ट्रक्टरच्या साह्याने अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान केले.
यावेळी फिर्यादी साहेबराव हाके त्यांची पत्नी शोभा व मुलगी सानिका याना आरोपी अतुल बळवंत हाके, नितेश बळवंत हाके, नाना आप्पा गवंड, विद्या नितेश हाके यांनी लोखंडी सळई व काठीने मारहाण केली. सदर प्रकरणी साहेबराव हाके यांच्या फिर्यादीनुसार आटपाडी पोलिसात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.