हेडिंग : करगणीत ‘सुलतान’ गाढव चोरीला; आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

0
2

आटपाडी (प्रतिनिधी):
करगणी (ता. आटपाडी) येथील अहिल्यादेवी होळकर चौक परिसरातून ‘सुलतान’ नावाचे गाढव चोरीला गेल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अनोख्या चोरीमुळे परिसरात उलटसुलट चर्चा रंगली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी लखन बापू जाधव (वय ३७, व्यवसाय – गाढव हाकणे, रा. करगणी) यांचे ‘सुलतान’ नावाचे गाढव १० मे २०२६ रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास अहिल्यादेवी होळकर चौक परिसरातून अचानक गायब झाले. जाधव यांनी गाढवाचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ते सापडले नाही.

आपल्या संमतीशिवाय गाढव लबाडीने चोरून नेल्याची खात्री पटल्याने त्यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून संशयित मिथून लहू पवार (रा. भोसले सावळज नगर, ता. तासगाव) याच्याविरुद्ध मंगळवारी (दि. १६) चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास आटपाडी पोलिस करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here