
छत्रपती संभाजी महाराजांच्या संघर्ष जीवनावरील छावा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये झुंबड उडत आहे. अशातच तिकिटे देखील मिळत नाहीएत. पहिल्या तीन दिवसांतच छावाने ₹116.5 कोटींचा गल्ला जमविला आहे. अशातच छावा सिनेमा ऑनलाईन लीक झाल्याने यावर परिणाम होणार आहे.
अनेकांनी थिटरमध्येच जाऊन सिनेमा पाहण्याचे मनाशी पक्के केले आहे. परंतू, हवी ती सीट मिळत नाहीय. तिकिटे खूप कमी दिसत आहेत. कारण सगळेच शो बुक करण्याच्या मागे लागले आहेत. संभाजी महाराजांवरील चित्रपट असल्याने तसेच स्टारकास्टही तगडी असल्याने हा चित्रपट पाहणाऱ्यांची मोठी संख्या आहे.
ऑनलाईन लीक झालेल्या चित्रपटाची प्रिंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फिल्मीझिला, टेलिग्रामवरील चॅनलवर हा चित्रपट लीक झाला आहे. अनेकांनी पाहिला देखील असेल. यामुळे छावा चित्रपटाच्या कमाईवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
छावा चित्रपटाने एकट्या सोमवारीच २४ कोटींची कमाई केली आहे. यामुळे या चित्रपटाची एकूण कमाई ही १४० कोटींवर गेली आहे. आता १५० चा टप्पा पार होण्याची शक्यता आहे. गेले चार दिवस चांगली प्रेक्षक संख्या असल्याने हा आठवडा चित्रपट हाऊस फुल चालण्याची शक्यता आहे.
‘छावा’ने बॉलिवूडला २०२५ वर्षाची दमदार सुरुवात करून दिली आहे. तर विकीसाठी ‘छावा’ हा त्याच्या आजवरच्या सिनेमांपैकी सर्वात मोठी ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कनुसार, ‘छावा’नं पहिल्या दिवशीच तब्बल ३३.१ कोटींचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या दिवशी ३९.३ कोटींची कमाई केली. तर सॅकनिल्कच्या पोर्टनुसार, तिसऱ्या दिवशी अर्थात रविवारी ४८.५ कोटी एवढी कमाई केली आहे. अशाप्रकारे एकूण १२० कोटींच्या पार हा आकडा पोहोचला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित’छावा’चित्रपटाच्या निर्मितीसाठी १३० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. चित्रपटाची कमाई पाहता लवकरच निर्मिती खर्च वसूल होईल असं दिसत आहे.