
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी /प्रतिनिधी: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेत नेत्रदीपक यश मिळवत महसुल सहाय्यक अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल सांगोला येथील कु.सना फारूक खाटीक, आटपाडीच्या उबेद उर्फ उमेद अस्लम पेंढारी तर राज्य कर सहाय्यक बनलेल्या सांगली येथील कु.फिरदोस मजिद खाटीकया तीन प्रज्ञावंताचा आटपाडी येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी इंजिनियर असिफ कलाल, असिफ उर्फ बाबु खाटीक, यपावादीचे सरपंच संभाजीमाने, सामाजीक कार्यकर्ते इकबाल पेंढारी, रियाज शेख, सलमान शेख, रहिमान खाटीक, नितीनडांगे, कुर्बानहुसेन खाटीक, जुनेद पेंढारी, सांगोला येथील फारूक खाटीक, अजिज खाटीक, आब्बास खाटीक,कासीम खाटीक, हैदर खाटीक, सांगली येथील असिफ मस्जीद खाटीक, हिना असिफ खाटीक इत्यादी अनेक जण उपस्थित होते.
उबेद पेंढारी, सना खाटीक, फिरदोस खाटीक यांचा सादिक खाटीक, सौ. राबियाँबसरी सादिक खाटीक, सौ. फरहीन कुर्बानहुसेन खाटीक,सौ. शमा इन्नुस खाटीक यांच्या हस्ते शाल, फेटा, पुष्पहार, पुष्पगुच्छ देवून सत्कार करणेत आला. रहीमान मिरा खाटीक यांच्या निवासस्थानी सना खाटीक यांचा सन्मान करणेत आला.तर असिफ कलाल यांच्या निवासस्थानी सौ. जीनत रशिद कलाल, सौ.नाजीया असिफ कलाल, इंजिनियर असिफ कलाल, इंजिनियर अमजद कलाल, इंजिनियर रईस कलाल, इंजिनियर असिम कलाल, याह्याखान कलाल यांच्या हस्ते सना खाटीक, फिरदोस खाटीक यांचा हृदयस्पर्शी सत्कार करणेत आला.