उद्याच्या बंद हा महाराष्ट्राच्या जनेतसाठी आहे. हा बंद विकृती विरोधी संस्कृती आहे. बऱ्याच पालकांना आपले मुलं शाळेत सुरक्षित आहे का? याची भीती वाटत आहे. याला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद आहे. उद्याचा बंद महाविकास आघाडीतर्फेच नाही तर सर्व जनतेचा बंद आहे. सर्वांना या बंदात सहभागी व्हा, तसेच उद्याचा बंद कडकडीत असावा बंद काळात ज्या अत्यावश्यक सेवा आहे त्या चालू राहतील. उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत हा बंद पाळावा. दुकानदारांनाही उद्या बंद पाळावा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.
उद्याच्या बंदचा फज्जा उडवू नका, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा
हिंसा होऊ नये माझी इच्छा आहे, पोलीस महासंचालिका यांनी लाडकी बहीण व्हावे ,मध्ये येऊ नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले. लोकल आणि बस सेवा ही बंद ठेवायला हवी, पोलिसांनी दादागिरी करू नका. सरकार अकार्यक्षम असलं तरी जनतेला सक्षम व्हावे लागते. उद्याच्या बंदचा फज्जा उडवू नका, नाही तर जनता दोन महिन्यांनी तुमचा फज्जा उडवेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजे : उद्धव ठाकरे
बदलापूर प्रकरणातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजेत. नाहीतर आम्हाला उद्या रस्त्यावर उतरावं लागेल. आम्ही लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नाही, पण सुरक्षित बहीण महत्त्वाची आहे. आता संतापचा कडेलोट होत आहे. आजही अटक सुरू आहे दरोडेखोरांना आणतात तसे आणले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.