CMA परीक्षांचे निकाल जाहीर! इथे पहा स्कोअरकार्ड

0
97

Institute of Cost Accountants of India कडून जून महिन्यात झालेल्या CMA परीक्षांचे निकाल जाहीर झाला आहे. आज, 23 ऑगस्ट 2024 च्या सकाळी 7 च्या सुमारास हा निकाल जाहीर झाला आहे. ICMAI कडून Intermediate आणि Final courses चे निकाल जाहीर झाले आहेत. विद्यार्थ्यांना हा निकाल icmai.in वर पाहता येणार आहे. यंदा ही परीक्षा 11 जून ते 18 जून दरम्यान घेण्यात आली होती. आता विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेचा निकाल, गुण पाहता येणार आहे.

इंटरमिजिएट परीक्षेत विविध स्वरूपात निकाल निकाल दिसले आहेत. एकूण 28,345 उमेदवारांनी भाग घेतला असून विविध गटांमधील उत्तीर्णतेची टक्केवारी बदलली आहे. त्यामुळे आता तुम्हांलाही निकाल पाहण्याची उत्सुकता असल्यास जाणून घ्या नेमका निकाल कसा आणि कुठे पहाल?

ICMAI CMA June 2024 Results ऑनलाईन कुठे पहाल?
अधिकृत वेबसाईट icmai.in ला भेट द्या.
होम पेज वर “ICMAI CMA Result June 2024” वर क्लिक करा.
आता रिझल्ट लिंक वर Intermediate or Final result यापैकी तुम्हांला ज्याचा निकाल पहायचा आहे तो कोर्स निवडा.
आता तुमचा 11 अंकी रजिस्ट्रेशन नंबर टाका.
आता निकाल पाहण्यासाठी सबमिट वर क्लिक करा.
तुमचा निकाल तुम्ही डाऊनलोड करून प्रिंट देखील करू शकता.
ICMAI CMA जून 2024 चे निकाल इंटरमीडिएट आणि फायनल कोर्समध्ये

Intermediate Group 1 मध्ये 11.06% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर Group 2 मध्ये 28.87% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अंतिम परीक्षेमध्ये ग्रुप 3 मध्ये 14.38% आणि ग्रुप 4 मध्ये 14.02% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here