हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘स्त्री 2’ ने बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई करत 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या अप्रतिम केमिस्ट्रीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले, त्यामुळेच चित्रपटाला इतके मोठे यश मिळाले आहे. या चित्रपटाने सुरुवातीपासूनच प्रचंड नफा कमावला होता.
बुधवारच्या प्रिव्ह्यूमधूनच चित्रपटाने 9.40 कोटी रुपये कमावले. चित्रपटाने गुरुवारी 55.40 कोटी रुपये, शुक्रवारी 35.30 कोटी रुपये, शनिवारी 45.70 कोटी रुपये, रविवारी 58.20 कोटी रुपये, सोमवारी 38.40 कोटी रुपये, मंगळवारी 26.80 कोटी रुपये आणि बुधवारी 20.40 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाने गुरुवारी 18.20 कोटींची भर घातली. अशा प्रकारे, ‘स्त्री 2’ ची एकूण कमाई 307.80 कोटींवर पोहोचली आहे आणि हा आकडा सतत वाढत आहे.