आमदार संतोष बांगर यांचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, आरटीओ अधिकाऱ्याला शिवीगाळ

0
405

आमदार संतोष बांगर नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि शिवीगाळ पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत राहतात. मारहाण आणि शिवीगाळ हे आमदार बांगर यांना काही नवीन नाही, अशा वक्तव्यामुळे आमदार बांगर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अनेक वेळा समज दिली. परंतु, मुख्यमंत्र्यांचा ऐकतील ते बांगर कसले? आमदार बांगर आरटीओ अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची एक कॉल रेकॉर्डिंग आता समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. कॉल रेकॉर्डिंग मधील संभाषणानुसार संबंधित आरटीओ अधिकारी हे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे कर्तव्य बजावत असताना त्यांनी एक गाडी पकडली होती. ती गाडी सोडून द्या असं आमदार बांगर यांचे म्हणणं होतं. परंतु, आपण कारवाई करतोय त्यासाठीच ही गाडी पकडली आहे, असे आरटीओ अधिकारी या संभाषणामध्ये सांगत आहेत. आमदार बांगर यांनी मात्र त्या आरटीओ अधिकाऱ्याला शिवीगाळ केली आहे. आरटीओ अधिकारी आणि आमदार बांगर यांच्या मधील काय संभाषण झालं आहे ते देत आहोत.

आमदार संतोष बांगर: कोण आरटीओ का ?

आरटीओ अधिकारी: हो बोलतोय साहेब

आमदार संतोष बांगर : आमदार बांगर बोलतो

आरटीओ अधिकारी: साहेब नमस्कार बोला ना साहेब

आमदार संतोष बांगर :अरे पकडू नका गाड्या अशा लहान लहान लोकांच्या, गरीब लोकांच्या, जरा मोठ्या लाईनच्या गाड्या पकडायच्या आपण, आपल्याला एक सांगायची आवश्यकता पडली नाही पाहिजे, आरटीओ साहेब.

आरटीओ अधिकारी: नाही नाही साहेब, कसं आहे थेंबा थेंबाने तळं साचतंय म्हणाल्या सारखं आहे

आमदार बांगर : थेंबा थेंबाने कशाच #@ उपटायचं तळ साचात का हो, गोरगरिबाच्या गाड्या पकडता, लाईनच्या गाड्या लाईनच्या कुठं गाड्या #@ उपटायला पकडता का तुम्ही हुशाऱ्या ##@@# थेंबा थेंबा न कशाचा @#@ #&#-#&&& तळ साचायले का? होय रे थेंबा थेंबा न तळे साचणार वाल्या हो रे गोरगरिबाला लुटायचं करायचं आणि चांगल्या लाईनच्या गाड्या सोडायच्या, मलिदा तिकडून मिळाला की विषय क्लोज गोरगरिबाच्या @#@ #&# लावायचे का? हा धंदा आहे का तुमचा

आरटीओ अधिकारी : असं बोलल्यावर मी काय बोलणार साहेब

आमदार बांगर: पीएचडी आहे या धंद्यात, आरटीओच्या धंद्यामध्ये मला सांगायची आवश्यकता नाही. थेंबा थेंबाने तळ साचतं तर या गरीबाच्या थेंबाने तळे साचवता का तुम्ही? चांगल्या लाईनच्या गाड्या पकडता का तुम्ही त्यांच्याकडे तर तुमची पर्ची देता तुमची,आगाऊ नाटकं करू नका ती गाडी सोडून द्या.

आरटीओ अधिकारी : साहेब गाडी त्या शेतकऱ्याची नाही.

आमदार बांगर: काय शेतकऱ्याची नाही म्हणता, शेतकऱ्याची गाडी आहे म्हणूनच त्यानं लावून दिला ना त्यांनी फोन, शेतकऱ्याची गाडी आहे. गाडी सोडून द्या, इकडे ऐका आरटीओ साहेब गाडी सोडून द्या,नाहीतर मला तुम्हाला सांगतो 26 तारखेपर्यंत बिझी आहे. मी 27-28 तारखेला मला पुसदला यायला वेळ लागणार नाही आणि गाड्या लावायला टाईम लागणार नाही. जेवढ्या गाड्या लागतील तेवढ्या गाड्या लावेल, मला माहिती आहे आरटीओ ची काय परिस्थिती असते ते

दरम्यान, या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी आम्ही करत नसून संभाषणावरुन कॉल रेकॉर्डिंग नेमक्या कोणत्या महिन्यातील आहे हे त्यावरुन स्पष्ट होत नाही.