सूक्ष्म वित्त पुरवठा जागरूकता कार्यक्रम संपन्न

0
23

माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या मायक्रोफायनान्स इंडस्ट्री नेटवर्क (एमएफआयएन) या स्वयंनियामक संघटनेच्या वतीने (एसआरओ) राजर्षि छत्रपती शाहु महाराज कॉलेज ऑफ अॅग्री बिझनेस मॅनेजमेन्ट, सांगली येथे सूक्ष्म वित्तपुरवठा (मायक्रोफायनान्स) जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला.

 

या कार्यक्रमास मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापक महेश पाटील, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कौन्सिल मेंबर रवींद्र ब्राह्मणकर, आरसीएसएम कॉलेज ऑफ एबीएम सांगलीच्या प्राचार्या डॉ. अर्चना शिंदे, एफएमआयएन पश्चिम क्षेत्राचे उपाध्यक्ष देवेंद्र शहापूरकर आदि उपस्थित होते.

 

भारतीय अर्थव्यवस्थेत सूक्ष्म वित्तपुरवठ्याचे महत्त्व विषद करताना मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे म्हणाले, ज्या ठिकाणी बँका पोहोचू शकत नाहीत, अशा ग्रामीण आणि दुर्गम भागात घरोघरी जावून वित्तीय सेवा देण्याचे काम सूक्ष्म वित्तपुरवठादार करतात. त्यांनी एमएफ कर्जाचे मुख्य पैलू आणि एमएफआयएसने देऊ केलेल्या सेवांवर प्रकाश टाकला.

 

सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांनी आर्थिक फसवणूक कशी टाळावी, दिशाभूल करणाऱ्या आर्थिक मोहिमांबद्दल बाळगावयाची सावधगिरी, अनोळखी मोबाइल फोन कॉलवर केवायसी माहिती न सांगण्याबद्दल व अशा फसवणुकीस टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले व अशा प्रकरणी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

 

आवश्यकता असली तरच कर्ज घ्यावे, आर्थिक नियोजन करावे, अवाजवी खर्चावर नियंत्रण ठेवावे, वेळेवर कर्जाचे हप्ते फेडावेत, याबाबत मार्गदर्शन करून आरसेटीचे संचालक महेश पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील अत्यल्प उत्पन्न गटातील महिलांना त्यांचे जीवनमान उंचावण्यात सूक्ष्म वित्तपुरवठ्याची मोठी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कौन्सिल मेंबर रवींद्र ब्राह्मणकर, प्राचार्या डॉ. अर्चना शिंदे तसेच एमएफआयएनचे पश्चिम क्षेत्र उपाध्यक्ष देवेंद्र शहापूरकर यांनी मार्गदर्शन केले.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here