गायरान जमीन प्रश्नांवर काम करणाऱ्या प्रतिनिधींची “या” ठिकाणी बैठक

0
3

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : बहुजन सामाजिक चळवळीत कार्यरत असणाऱ्या व गायरान जमीन प्रश्नांवर काम करणाऱ्या प्रतिनिधींची विटा येथील अग्रणी फौंडेशनच्या वतीने शुक्रवार दि. ३१ मी २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन मुनीर सुलताने यांनी केले आहे.

बहुजन व भटके विमुक्तांच्या अतिक्रमित जमिनी व निवासी गायरान, इतर जमीनीवर अतिक्रमण करून रहात असेलेले निवासी घरावर मुंबई उच्च न्यायालयाच्या 17 एप्रिल 2024 च्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1 जुनच्या पूर्वी संपुर्ण अतिक्रमणे निष्कासित करण्यात येत आहे.

या शासन आदेशांमुळे बहुजन व भटके विमुक्तांच्या जीवनामरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा व नियोजन करण्याकरिता शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता अग्रणी फौंडेशनच्या विटा येथील कार्यालय येथे उपस्थित रहावे असे आवाहन मुनीर सुलताने यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here