माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी पोलिसांनी बेकायदेशीर, अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करत त्यांच्यावर दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. गुन्हे दाखल झालेल्यामध्ये बनपुरी, माडगुळे, विठलापूर येथील आरोपींचा समावेश आहे.
बनपुरी येथे आरोपी भानुदास चंदू मंडले यांच्याकडून देशी संत्रा दारूच्या १० बाटल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. माडगुळे येथे आरोपी आगतराव गणपत जेडगे यांच्याकडून १३ देशी संत्रा दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. विठलापूर येथे आरोपी गौरीहार दिगंबर बाड हा हनुमान मंदिराच्या कट्यावर बसून बंदी असलेला कल्याण नावाचा मटका जुगार चालवत होता. त्याच्याकडे मटक्याच्या चिठ्या तसेच रोख १२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई अनुक्रमे राजीव झाडे, लक्ष्मण मेंडके व प्रमोद रोडे यांनी केली असून सदर गुन्हाचा पुढील तपास पीआय प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.