सांगली : स्नेहभोजनाला बंडखोर उमेदवार विशाल पाटील हजर राहिल्याने महाविकास आघाडीत नाराजीनाट्य

0
8

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : सांगलीत काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत राबलेल्या कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होते. याच स्नेहभोजनाला बंडखोर उमेदवार विशाल पाटील हजर राहिल्याने महाविकास आघाडीत नाराजीनाट्य सुरू झाले आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्षांवर कारवाई करा अन्यथा विधानसभेत आघाडीत मोडीत काढण्याचा इशारा ठाकरे दिला आहे.

विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटलांची हकालपट्टी करा, नाहीतर सांगलीत आघाडी होणार नाही, असे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते म्हणाले आहेत. परंतु याला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना नेत्यांनी तक्रार असल्यास आपल्या नेत्यांकडे बंद खोलीत करावी, असा टोला लगावलाय.

सांगली लोकसभेसाठी महाविकस आघाडी कडून ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. त्यातच मतदान झाल्यानंतर विश्वजीत कदम यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात आपण कुणाच्या बाजूने हे 4 जूनला कळेल, असे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भूव्यां उंचावल्या होत्या. काँग्रेसच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला विशाल पाटील यांचे नाव पत्रिकेत असल्यामुळे व विशाल पाटील या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने, सांगली महाविकास आघाडीमध्ये एकमेकांच्यावर टीकेचे बाण सुरु आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here