उन्हाचा चटका वाढल्याने लिंबांना आला ‘भाव’

0
68

माणदेश एक्सप्रेस/पुणे : उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बाजारात लिंबांचे दर कडाडले आहेत. बाजारात लिंबांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात एक लिंबू दर्जानुसार ८ ते १० रुपयांना एक नग मिळत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने दर तेजीत आहेत.

 

 

बाजारात रसाळ, मोठ्या आकाराच्या लिंबांचे दर जास्त असूनही त्यांना अधिक मागणी आहे. या महिनाभरापासून लिंबांना अधिक मागणी वाढली आहे. त्यामुळे भावात प्रचंड वाढ झाली आहे. जूनपर्यंत हीच स्थिती कायम राहील.

 

पिंपरी बाजारात गेल्या दीड-दोन महिन्यांपूर्वी ३०० ते ४०० गोणी लिंबांची आवक होत होती. मात्र, सध्या ही आवक निम्म्यावर आली आहे. बाजारात सध्या १५० ते २०० गोण्यांची आवक होत आहे. त्यातच आता उन्हाच्या वाढत्या झळांमुळे लिंबांना मागणी वाढली आहे. एका गोणीत आकारमानानुसार ३५० ते ४५० लिंबू असतात. सध्या घरगुती वापराबरोबरच हॉटेल्स, रसवंतिगृह आणि ज्यूस सेंटरकडून लिंबांना मोठी मागणी असते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here