पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो आला समोर, ओळखही पटली

0
511

जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तर काही पर्यटक जखमी झाले. दहशतवाद्यांनी पर्यटकांचं नाव, धर्म विचारून त्यांना गोळ्या झाडल्याचे समोर आल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती आता समोर येऊ लागली आहे. हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा एक फोटो समोर आला असून, या दहशतवाद्यांपैकी दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक असल्याचे उघड झाले आहेत.

 

 

 

पहलगाममधील बैसरन येथे एकूण चार दहशतवाद्यांनी हल्ला केला, तर आणखी तीन दहशतवादी हे त्यांच्या कारवाईवप लक्ष ठेवून होते, अशी माहिती तपासामधून समोर आली आहे. हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांपैकी दोघेजण पश्तून भाषेत बोलत असल्याचीही माहिती मिळाली आहे. या दहशतवाद्यांनी सुमारे १५ ते २० मिनिटे एके-४७ च्या माध्यमातून गोळीबार करत पर्यटकांना टिपून टिपून लक्ष्य केल्याचंही समोर आलं आहे.

 

 

 

दरम्यान, हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांपैकी दोघा स्थानिक दहशतवाद्यांची नावं आदिल गुरी आणि आसिफ शेख असल्याची माहिती मिळाली आहे. तर या दोघांसोबत आणखी दोन पाकिस्तानी दहशतवादी होते. पहलगाममध्ये काल झालेल्या या हल्ल्यात एकूण २६ पर्यटक मारले गेले होते. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तोयबाशी संबंधित द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here