कुणाल कामराने ठोठावले मुंबई उच्च न्यायालयाचे दार

0
89

माणदेश एक्सप्रेस/मुंबई : मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने आता मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. कुणाला कामराने घटनेतील काही मुद्द्यांच्या उल्लेख करत हा गुन्हा रद्द करण्याची मागणी कुणाल कामराने केली आहे. त्यामुळे कुणाल कामराला दिलासा मिळणारा की, पोलिसांना, याकडे सगळ्याचे लक्ष आहे.

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक गाणे सादर केल्याने मोठा वाद झाला. या प्रकरणी कुणाल कामराविरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी कुणाल कामराने केली आहे.

 

कुणाल कामराने याचिकेत म्हटले आहे की, मूलभूत हक्क असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जगण्याचा हक्का या कलम १९ आणि २१ नुसार माझ्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.व्ही. कोटवाल आणि न्यायमूर्ती एस.एम. मोडक यांच्या खंठपीठासमोर सुनावणी होणार आहे. २१ एप्रिल रोजी याचिकेवर सुनावणी होणार आहे.

 

मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यापूर्वी कुणाल कामराने मुंबई पोलिसांना पत्र पाठवले. त्याने पोलिसांकडे विनंती केली की, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्यात यावा.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here