खानापूर, विसापूर सर्कलला पडळकरांच्या रूपाने मिळाला तिसरा पर्याय

0
44

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी/प्रतिनिधी : लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. येणाऱ्या तीन ते चार महिन्यांमध्येच विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निमित्ताने खानापूर तालुक्यात व विसापूर सरकारमध्ये दोन्ही प्रस्थापित नेत्यांचीच कायम वर्चस्व राहिले होते. मात्र या वर्चस्वाला छेद देत आमदार गोपीचंद पडळकर व माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी मोठा जनाधार मिळाला आहे. तर विसापूर व खानापूर तालुक्याला ब्रम्हानंद पडळकर यांच्या रूपाने तिसरा पर्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आटपाडी तालुका व खानापूर तालुका आणि तासगाव तालुक्यातील विसापूर गटातील 23 गावे मिळून मतदार संघ बनला आहे. मागील पंधरा वर्षापासून या दोन्ही तालुक्यातील तालुक्यांमध्ये माजी आमदार सदाशिवराव पाटील व दिवंगत आम. अनिल बाबर या गटाचे वर्चस्व राहिले आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये भाजपाने कुठे शिरकाव केला नव्हता. मात्र विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गेल्या काही दिवसापासून विसापूर सर्कल व खानापूर तालुक्यामध्ये आपले गट तयार करण्यास सुरुवात केली असून त्यांनी युवकांचे मोठे संघटन केले आहे. त्यांना खंबीर अशी साथ त्यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांची लाभली असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये खानापूर विधानसभा मतदारसंघातून ब्रह्मानंद पडळकर हेच निवडणूक लढवण्यास इच्छुक असून, तशी त्यांनी तयारी केली आहे. विसापूर सर्कल मधील 23 गावांमध्ये त्यांनी मोठे संघटन तयार केले आहे. युवक, महिला, ज्येष्ठ मंडळी यांनी त्यांना पसंती दिली आहे.

घाटमाथ्यावरील गावे याचबरोबर खानापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये त्यांनी आपले नेटवर्क तयार केले आहे. बुथनिहाय कमिट्या तयार केले आहेत. प्रथमच भाजपाने विटा शहर व खानापूर तालुका विसापूर सर्कल येथे मोठी ताकद निर्माण केली आहे. आमदार गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांनी भाजपा वाढीसाठी मोठे योगदान देत असताना त्यांना विटा शहर घाटमाथ्यावरील गावे विसापूर सर्कल येथील कार्यकर्ते यांनी मोठे सहकार्य केले आहे.

खानापुर तालुक्यामध्ये बाबर व पाटील या दोन्ही प्रस्थापित नेत्यांनी जनतेला गृहीत धरून राजकारण केले आहे. मात्र या दोन्ही नेत्याला आता सर्वसामान्य जनता कंटाळली होती. मात्र त्यांच्यापुढे तिसरा सक्षम पर्याय नसल्याने या दोन्ही प्रस्थापित नेत्यांच्या पाठीशी जनता होती. मात्र आता आमदार पडळकरांच्या रूपाने व माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या रूपाने जनतेला तिसरा पर्याय मिळाला आहे. या तिसऱ्या पर्यायाला जनतेच्या जनतेकडून भरभरून असा प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या निवडणुकीत विसापूर सर्कल व खानापूर तालुका विटा शहर यामधून पडळकर बंधूंचे वर्चस्व दिसू लागले आहे.

रविवारी विटा येथे आमदार गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा विटा शहर येथील कार्यक्रमाचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये विटा तालुक्यातील व शहरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी अनेक गावातील सरपंच आणि पडळकर बंधूंच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याची ग्वाही देत, येणाऱ्या विधानसभेला भाजपचाच आमदार होईल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here