आटपाडी : बलात्कार पिडीतेवर अज्ञाताकडून हल्ला ; तालुक्यात खळबळ ; पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने केला हल्ला

0
5087

माणदेश एक्सप्रेस न्युज :आटपाडी/प्रतिनिधी : एका जिम चालक व खाजगी परिचारिकेने एका अल्पवयीन मुलीला जबरदस्ती गाडीत बसवून नेट बलात्कार करण्याची घटना घडली होती. याबाबत आरोपी जिम चालक संग्राम देशमुख व परिचारिका सुमित्रा लेंगरे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

 

शनिवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास पीडिता घराच्या बाहेर उभारली असताना तीन अनोळखी अज्ञातांनी तिच्यावर कटरने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने पीडितेला कोणतीही जखम झाली नाही. यावेळी पीडितेने बचावासाठी आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत. घटनास्थळी पीडितेवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेले कटर सापडले आहे. दरम्यान या घटनेनंतर परीसरामध्ये खळबळ माजली आहे.

पीडितेवर हल्ला नेमका कोणी केला? व कशासाठी केला हे अद्याप समजू शकले नाही. घटनास्थळी पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी धाव घेत पाहणी केली. दरम्यान पोलीस या घटनेचा तपास करत असून हल्लेखोरांना पकडणे पोलिसांच्या पुढे आव्हान आहे.