आटपाडी : झरे येथे चारचाकी गाडीने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू

0
1646

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील झरे येथे सकाळी व्यायामला गेलेल्या महिलेला चारचाकी गाडीने धडक दिली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती. परंतु सदर महिलेचा यामध्ये मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद आटपाडी पोलिसात झाली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी, झरे येथील गोकुळा गणपत अर्जुन आणि कल्पना सातपुते ह्या दोघी झरे ते शेनवडी रोडने वाकिंग करण्यासाठी गेल्या होत्या. जगन्नाथ तरंगे यांच्या घराजवळुन परत माघारी झरे कडे येत असताना एमएसईबी ऑफिस जवळ चार चाकी वाहनाने गोकुळा गणपत अर्जुन यांना पाठीमागून भरधाव वेगाने धडक दिली.

 

यामध्ये गोकुळा यांना डोक्याला छातीला पायाला गंभीर जखमी केले. यावेळी अज्ञात चारचाकी वाहनाने घटनास्थळावरून पलायन केले. याबाबत राजू अर्जुन यांनी आटपाडी पोलिसात अज्ञात चारचाकी वाहन चालका विरुद्ध फिर्याद दिल्या नुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सदरची घटना ही आज दिनांक दिनांक ०६ रोजी सकाळी 6.00 वा चे सुमारास एमएसईबी ऑफिस जवळ झरे गावी घडली.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here