महत्वाची बातमी! यूपीएससीच मोठं पाऊल,परीक्षेसाठी लागणार ‘या’ गोष्टीची गरज,वाचा सविस्तर

0
143

यूपीएससीकडून आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये काही उमेदवारांकडून फसवेगिरी केल्याची अनेक उदाहरणं समोर आली होती. त्यामुळं यूपीएससीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. आता परीक्षांमधील फसवेगिरीला चाप लावण्यासाठी यूपीएससीनं मोठं पाऊल टाकलं आहे. संघ लोकसेवा आयोग लवकरच स्पर्धा परीक्षांचं आयोजन करताना आधार प्रमाणीकरणाचा वापर करणार आहे.

यूपीएससी उमेदवारांच्या परीक्षा आणि नियुक्ती प्रक्रियेसाठी आधार प्रमाणीकरणाचा वापर करणार आहे. सध्या तरी ही प्रक्रिया वैकल्पिक असणार आहे. यूपीएससी कडून यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. यामध्ये यूआयडीएआयच्या आधार कायद्यातील नियम आणि तरतुदींचं पालन यूपीएससीकडून केलं जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

यूपीएससीनं आधार प्रमाणीकरण वैकल्पिक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकार अशाच प्रकारचा नियम लागू करण्याच्या सूचना स्टाफ सिलेक्शन कमिशनला देखील देण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी एका आयएएस अधिकाऱ्यानं 2022 च्या नागरी सेवा परीक्षेत नियमांचं उल्लंघन केल्याचं प्रकरण उघडकीस आलंहोतं. त्यानंतर यूपीएससीनं संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस देखील जारी केलं होतं. नियमांचं उल्लंघन करुन निश्चित करण्यात आलेल्या प्रयत्नांपेक्षा अधिक वेळा परीक्षा देण्यात आल्याचं त्या प्रकरणात उघडकीस झालं होतं. कागदपत्रांमध्ये देखील फेरफार झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं.

यूपीएससीनं बुधवारी जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार त्यांना परीक्षा आणि नियुक्ती प्रक्रियेत आधार प्रमाणीकरणाचा वापर करण्यास परवानगी मिळालेली आहे. यूपीएससीनं परीक्षेसाठी नोंदणी करताना आणि परीक्षेच्या विविध टप्प्यांवर आधार प्रमाणीकरण सध्या वैकल्पिक सुरु केलं आहे. पुढील काही दिवसांमध्ये ते सर्व उमेदवारांसाठी लागू केलं जाऊ शकतं.

आधार मुळं फसवेगिरीला चाप लागणार
आधार प्रमाणीकरणाचा वापर यूपीएससी आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून परीक्षा आणि भरती प्रक्रियेत विविध टप्प्यांवर केला गेल्यास फसवेगिरी बंद होणार आहे. आधार प्रमाणीकरणामुलं उमेदवारांची ओळख पटवणं यूपीएससीला सोपं होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या प्रकरणानंतर परीक्षा आयोजनात मोठा बदल केला जाण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे यूपीएससी परीक्षेत आधार प्रमाणीकरण केलं गेल्यास एमपीएससीमध्ये देखील आधार कार्ड पडताळणी केली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here