सलमानची प्रकृती अस्थिर; उठता-बसताना जाणवतोय त्रास, पहा व्हिडीओ

0
519

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानने गुरुवारी मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात सलमान नेहमीप्रमाणे त्याच्या कॅज्युअल लूकमध्ये पोहोचला होता. कार्यक्रमातील त्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये सलमानला बसलेल्या जागेवरून उठायलाही बराच त्रास जाणवत होता. त्यामुळे चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली. नंतर ही गोष्ट उघडकीस आली की सलमानच्या बरगड्यांना दुखापत झाल्याने त्याला उठता-बसताना त्रास जाणवत होता. दुखापतग्रस्त असतानाही सलमानने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं ठरवल्याने नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुकही केलं.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये सलमान मंचावर इतर पाहुण्यांसोबत बसलेला दिसतोय. यानंतर जेव्हा त्याला पुढे बोलवतात, तेव्हा जागेवरून तो चाचपडत उठताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडवणीससुद्धा दिसून येत आहेत. आरोग्याची समस्या असतानाही कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी सलमानचे विशेष आभार मानले आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी सलमानच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली आहे.

 

‘सलमानच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे, तरी काही मूर्ख लोक त्याच्यावर वाईट कमेंट्स करत आहेत. या वयातही सलमान इतरांच्या तुलनेत खूप फिट आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘तब्येत बरी नसतानाही भाईजान कार्यक्रमाला उपस्थित होता, हीच मोठी आहे’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. कमेंट्समध्ये अनेकांनी सलमानला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत.

याच कार्यक्रमातील सलमानचा आणखी एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो ‘जलवा’ या गाण्यावर नाचताना दिसून येत आहे. सलमानला नाचताना पाहून उपस्थित प्रेक्षक त्याच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट करतात आणि शिट्ट्या वाजवतात. कार्यक्रमात सलमानसोबतच अभिनेत्री सोनाली बेंद्रेसुद्धा उपस्थित होती. तिच्यासोबतचा ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा मजेशीर किस्साही सलमाने सांगितला.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here