भारतात पासपोर्ट सेवा पोर्टल ‘या’ कालावधीत राहणार बंद, काय आहे कारण?

0
166

भारत सरकारचे ऑनलाइन पासपोर्ट सेवा पोर्टल (Passport Seva Portal) नियोजित देखभाल, दुरुस्तीसाठी (Government Maintenance) पाच दिवसांसाठी तात्पुरते अनुपलब्ध असणार आहे. प्राप्त माहितीनुसार, हे पोर्टल भारतीय प्रमाण वेळेनुसार गुरुवारी रात्री (29 ऑगस्ट, 2024) 8:00 वाजलेपासून सोमवार, 2 सप्टेंबर, 2024 रोजी सकाळी 6:00 IST पर्यंत बंद राहील. या कालावधीत कोणत्याही प्रकारची माहिती, नवीन पारपत्र (New Passport) भेटी आदिंना प्रतिबंधित केले जाईल. याव्यतिरिक्त, 30 ऑगस्ट, 2024 साठी आधीच बुक केलेल्या अपॉइंटमेंट्स, अर्जदारांना त्यानुसार सूचित केल्या जातील. आणि त्यांचे नव्याने वेळापत्रक जारी करुन त्याचा निपटारा केला जाईल.

‘देखभाल दुरुस्ती नियमीत कामाचा भाग’
पासपोर्ट सेवा पोर्टलवरील अधिसूचनेत म्हटले आहे की, “पासपोर्ट सेवा पोर्टल तांत्रिक देखभालीसाठी 29 ऑगस्ट 2024, गुरुवार 20:00 IST ते 2 सप्टेंबर, सोमवार 06:00 IST पर्यंत बंद असेल. या कालावधीत नागरिक आणि सर्व MEA/RPO/BOI/ISP/DoP/पोलीस प्राधिकरणांसाठी सिस्टम उपलब्ध नसेल. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) पुष्टी करताना सांगितले की, हा एक नियमित देखभाल, दुरुस्तीचा भाग आहे. दरम्यान, मंत्रालयातील स्त्राताच्या माहिती आधारे, एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले की, भेटींचे पुनर्नियोजन व्यवस्थापित करण्यासाठी आकस्मिक योजना सुरु आहेत. “अपॉइंटमेंट्सच्या पुनर्नियोजनासाठी, आमच्याकडे नेहमीच आकस्मिक योजना असतात. पासपोर्ट सेवा केंद्रांसारख्या सार्वजनिक-केंद्रित सेवेसाठी देखभाल क्रियाकलाप नेहमीच आगाऊ नियोजित केला जातो. जेणेकरून लोकांची कोणतीही गैरसोय होणार नाही. त्यामुळे भेटीची वेळ पुन्हा शेड्यूल करणे हे एक आव्हान असणार नाही”, सूत्राने सांगितले.

पासपोर्ट सेवा पोर्टलचा नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर वापर
पासपोर्ट सेवा पोर्टलचा वापर नागरिकांकडून देशभरातील पासपोर्ट केंद्रांवर अपॉईंटमेंट बुक करण्यासाठी केला जातो. मग तो नवीन पासपोर्टसाठी अर्ज करायचा असो किंवा सध्याच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्यासाठी. नियुक्तीच्या दिवशी, अर्जदारांनी त्यांच्या कागदपत्रांसह पासपोर्ट केंद्रांना पडताळणीसाठी भेट देणे आवश्यक आहे. यानंतर पोलिस पडताळणी केली जाते, त्यानंतर पासपोर्ट अर्जदाराच्या पत्त्यावर दिला जातो. अर्जदार नियमित मोड, जेथे पासपोर्ट 30-45 कामकाजाच्या दिवसांत वितरित केला जातो किंवा तत्काळ मोड, जो प्रक्रियेला वेग देतो, काही दिवसांत पासपोर्ट वितरित करतो यापैकी एक निवडू शकतो.

पारपत्र म्हणजेच पासपोर्ट हे सरकारने जारी केलेले अधिकृत दस्तऐवज आहे. जे आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या उद्देशाने त्याच्या धारकाची ओळख आणि राष्ट्रीयत्व प्रमाणित करते. त्यात सामान्यतः धारकाचे नाव, छायाचित्र, जन्मतारीख आणि इतर ओळख पटवणारी माहिती समाविष्ट असते. परदेशात प्रवास करताना पारपत्र हा ओळखपत्राचा प्राथमिक प्रकार म्हणून काम करते. हे धारकाला परदेशात प्रवेश करण्याची आणि बाहेर पडण्याची आणि त्यांच्या मायदेशी परतण्याची परवानगी देते. काही देशांमध्ये अभ्यागतांना व्हिसा असणे आवश्यक असते, ज्यावर अनेकदा शिक्कामोर्तब केले जाते किंवा पारपत्राला जोडलेले असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here