राशिभविष्य

राशिभविष्य ; आज दिनांक १७ मे २०२४ ; “या” राशीतील लोकांना आहे वाहन किंवा जमीन खरेदीचे योग ; तुमची राशी काय सांगते ; वाचा सविस्तर

नवीन योजनेची योग्य अंमलबजावणी होईल.

मेष : सामाजिक संपर्क क्षेत्रात वाढ होईल. विद्यार्थ्यांनी योग्य दिशेने प्रयत्न केल्यास यश मिळेल. प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल. धोकादायक कामे टाळा. जमीन-मालमत्तेच्या बाबतीत वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल. नकारात्म.क बातमीमुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवा जाणवेल.

 

वृषभ : नवीन योजनेची योग्य अंमलबजावणी होईल. अनुभवातून प्रेरणा घेऊन उज्वल भविष्याकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न कराल. सामाजिक सेवा संस्थेत सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्राच्या वागण्यामुळे मन निराश होईल. धोकादायक कामे टाळा. वैयक्तिक फायद्यासाठी गोष्टी करताना तुमचा अहंकार आड येऊ देऊ नका. कार्यक्षेत्रात तयार केलेली नवीन योजनेची योग्य अंमलबजावणी होईल. जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. आरोग्याबाबत काळजी घ्या.

 

मिथुन : आज तणाव दूर झाल्यािने मनःशांती लाभेल. मागील काही काळापासून सुरु असलेला तणाव आज दूर झाल्याहने मनःशांती लाभेल. उत्पन्न आणि खर्चात योग्य ताळमेळ राखाल. कुटुंबासोबत खरेदीमध्येही चांगला वेळ जाईल. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. कोणत्याही प्रकारची जोखीम घेण्या पासून लांब राहा. शेजाऱ्याशी वाद टाळा. कार्यक्षेत्रात आर्थिक बाबी गांभीर्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. घरगुती बाबींमध्ये जास्त ढवळाढवळ न केल्यास बरे होईल. पोटाशी संबंधित आजार त्रासदायक ठरू शकतात.

 

कर्क : वाहन किंवा जमीन खरेदीचे योग. लाभदायक दिवस आहे. चांगली बातमी मिळेल. वाहन किंवा जमीन खरेदीचे योग आहेत. मुलांना पालकांचे सहकार्य लाभेल.धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळू शकते. शेजाऱ्याशी वाद टाळा. दुपारनंतर बेकायदाशीर कामातील व्यक्तीशी भेट त्रासदायक ठरेल. मित्रासोबतच्या मतभेदांमुळे मन निराश होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा कायम राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.

 

सिंह : आर्थिक स्थिती चांगली राहील. दैनंदिन कामे सहजतेने आणि लवचिकतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. घराचे नूतनीकरण कामांमध्ये जास्त वेळ जाईल. तुमच्या कौशल्यामुळे वैयक्तिक कामे योग्य प्रकारे पार पाडाल. दुपारनंतर भावनिक होवून विचार करु नका. व्यवहारी राहा. महिलांवर घरगुती जबाबदाऱ्या वाढू शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहील. पती-पत्नीचे एकमेकांशी चांगले संबंध राहतील. शारीरिक आणि मानसिक श्रमामुळे थकवा आणि तणाव जाणवेल.

 

कन्या : गुंतवणुकीबाबत निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. आज जवळच्या मित्राचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. हा काळ तुमच्यासाठी उत्कर्ष देणारा आहे, त्याला योग्य आधार द्या. सामाजिक कार्यात तुमची आवड कायम राहील. मत्सरामुळे काही लोक टीका करत तुम्हाकला तुमच्या ध्येयापासून दूर ठेवण्या चा प्रयत्न. करतील. गुंतवणुकीबाबत निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. पती-पत्नीचे नाते अधिक मधूर होईल. सांधेदुखीचा त्रास जाणवेल.

 

तूळ : व्यवसायात मेहनतीला यश मिळेल. आज दिवस आनंददायी आहे. कामातील व्यस्तता फायदेशीर ठरेल. मात्र मुलांच्या कोणत्याही वागण्यामुळे मन उदास राहू शकते. शांतपणे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये अप्रिय व्यक्तीच्या प्रवेशाने मन निराश होईल. दुसऱ्याच्या कामात गोंधळ घालू नका. व्यवसायात तुमच्याी मेहनतीला यश मिळेल. पती-पत्नी एकमेकांच्या भावनांचा आदर करतील. आरोग्याच्या दृष्टीने वेळ फारसा अनुकूल नाही.

 

वृश्चिक : तुमच्यावर कामाचा अतिरिक्तफ ताण असेल. हा काळ काही संमिश्र परिणाम देईल.आवडत्या कामांना वेळ दिल्याएस मनःशांती मिळेल. प्रिय व्यक्तीसोबत संवाद साधाल. तुमच्यावर कामाचा अतिरिक्तळ ताण असेल. अनुभवाअभावी काही कामे प्रलंबित ठेवाल. व्यावसायिक बाबतीत योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये भावनिक गोडवा वाढेल. जास्त कामाचा भार शारीरिक आणि मानसिक थकवा वाढवेल.

 

धनु : कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागतील. भविष्यात नवीन योजना आखल्या जातील. अहंकारामुळे नातेवाइकांशी काही दुरावा निर्माण होऊ शकतो. इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवा. सहकार्यांाशी सहकार्य ठेवा. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. पाय दुखण्याची समस्या जाणवू शकते.

 

मकर : व्यवसायाशी संबंधित निर्णय त्वरित घेण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी अनुभवाल. कोणत्याही समस्येवर कठोर परिश्रम करून उपाय शोधाल. घरातील पाहुण्यांच्या हालचालीमुळे वातावरण प्रसन्न राहील. कायदेशीर बाबींमध्ये तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. प्रवासाचे कोणतेही नियोजन करू नका. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. यावेळी व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय त्वरित घेण्याचा प्रयत्न करा. पती-पत्नीमधील सलोखा चांगला राहील. पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतील.

 

कुंभ : व्यवसायात नवीन संधी मिळेल. काही काळापासून सुरू असलेल्या कौटुंबिक समस्या तुम्ही संयमाने सोडवाल. व्यावसायिक कौशल्याद्वारे घर आणि व्यवसाय दोन्ही ठिकाणी योग्य सुसंवाद राखाल. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात थोडी लवचिकता आणावी लागेल. व्यवसायात नवीन संधी मिळेल. कोणत्याही कठीण परिस्थितीत तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

 

मीन : खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. तुमच्या विशेष यशामुळे घरामध्ये आणि नातेसंबंधांमध्ये आदर वाढेल. तुम्ही परस्पर सल्ला आणि समजूतदारपणाने कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तसेच मुलांच्या संगतीची काळजी घ्या. काही वेळा तुम्हाला थोडे निराश आणि अस्वस्थ वाटू शकते. व्यवसायातील कार्यप्रणाली बदलाल. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून तुम्ही तुमची कार्ये अधिक चांगल्या प्रकारे राखण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक आनंद कायम राहील.

(टीप : वाचक पर्यंत माहिती पोहचविणे हा उद्देश, यातून माणदेश एक्सप्रेस कोणताही दावा करत नाही, अंधश्रद्धा पसरवत नाही.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button