आटपाडी तालुक्याला वादळी वाऱ्याचा दणका ; अनेक घरांचे पत्रे गेले उडून गेल्याने मोठे नुकसान

0
5
आटपाडी तालुक्याला वादळी वाऱ्याचा दणका ; अनेक घरांचे पत्रे गेले उडून गेल्याने मोठे नुकसान
आटपाडी तालुक्याला वादळी वाऱ्याचा दणका ; अनेक घरांचे पत्रे गेले उडून गेल्याने मोठे नुकसान

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी/प्रतिनिधी :   आटपाडी तालुक्याला अवकाळी पावसाने दणका दिला असून वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले असून हिवतड येथील घरांचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले असून नुकसान झालेले नागरिक प्रशासकीय पंचानाम्याच्या प्रतीक्षेत आहेत.

आटपाडी तालुक्यात गुरुवारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने हिवतड, गोमेवाडी गावातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. छतावरील पत्रे उडून गेले असून काही घरांच्या भिंती पडल्या आहेत. तर एका बैलांच्या अंगावर झाड पडल्याने बैल जखमी झाला असला तरी, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु विभूतवाडी येथे एकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

हिवतड येथील भानुदास गंगाराम डोंबाळे व विलास तातोबा यमगर यांच्या घराचे पत्रे उडून गेल्याने, जीवनावश्यक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारी चार ते पाच च्या आसपास अचानक आलेले वादळी वाऱ्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरसुंडी, दिघंची, झरे व आटपाडी भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here