आजचे राशीभविष्य 27 जुलै:आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवण्यासाठी अत्यंत योग्य दिवस… जाणून घ्या कसा असेल तुमचा  आजचा दिवस ?

0
1495

मेष: आजचा दिवस संमिश्र आहे. आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अशक्तपणा जाणवेल. जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे.

वृषभ: आजचा दिवस तुम्हाला आनंदी ठेवेल. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून लाभलेली साथ भविष्यात फायदेशीर ठरेल.

मिथुन: मिथुन राशीतील व्यक्तींनी आज प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. शक्य असल्यास प्रवास टाळा. पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका. कोणत्याही नवीन कामाचे आज नियोजन करू नका.

कर्क: आजचा दिवस मिश्र असेल. घर-जमिनीसंदर्भातील समस्या निर्माण होण्याची शक्यता. रखडलेली कामे पूर्ण वेळेत पूर्ण करा. आजूबाजूच्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. कुटुंबाची काळजी घ्या.

सिंह: आज घरातील वातावरण ताणतणावाचे राहील. जवळच्या व्यक्तीचे मन दुखावले जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे जिभेवर ताबा ठेवा. रागावर नियंत्रण असु दे.

कन्या: कन्या राशीतील व्यक्तींना आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवण्यासाठी योग्य दिवस. मात्र विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यवसायात वृद्धी होईल. नोकरीच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळेल. घरातील मंडळींची साथ लाभेल.

तुळ: तुळ राशीतील व्यक्तींचा आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाल. रखडलेली कामे होती. आई-वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल.

वृश्चिक: आज कंबरदुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. तब्येतीकडे दुर्लश्र करु नका. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल. जिभेवर नियंत्रण ठेवा.

धनु: आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. जवळच्या व्यक्तीचे मन दुखावले जाण्याची शक्यता. वादविवाद टाळा नाहीतर नक्कीच पश्चाताप होईल. घरातील मंडळींचे सल्ले फायद्याचे ठरतील. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.

मकर: आजचा दिवस उत्तम असणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. व्यवसायातही प्रगती होईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता. कुटुंबासाठी आर्थिक बाबींचे नियोजन करण्यासाठी चांगला दिवस.

कुंभ: आजच्या दिवसाची सुरुवात उत्तम होणार नाही. परंतु काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. चिडचिडपणा वाढेल मात्र नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. आत्मविश्वास बाळगल्यास दुपारनंतर कामे पूर्ण होतील. खर्चावर नियंत्रण देवा.

मीन: आज घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत, परंतु त्यावर वाद घालू नका. जवळच्या व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल. आळशीपणामुळे कोणतेही महत्वाचे काम टाळू नका. मित्र-मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here