“आरशात पाहिलं का? सरडा पण लाजेल”; या टीकेला आदित्य ठाकरेंचे जोरदार प्रत्युत्तर

0
247

माणदेश एक्सप्रेस/मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकहाती सत्ता मिळवून राज्यात सरकार स्थापन केलं आहे. महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी विरोधीपक्षनेते पद मिळण्याइतकेही आमदार निवडून आणले नाहीत. दुसरीकडे, सत्ता स्थापनेनंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. आदित्य ठाकरे यांच्या या भेटीवरुन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावरुनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना सरड्याची उपमा दिली.

 

महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होऊनही नव्या राजकीय समीकरणाच्या चर्चा अद्याप सुरु आहेत. अशातच शिवसेना उद्धव गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मुंबईतील विविध समस्या आणि लोकसभा मतदारसंघातील प्रश्नांसाठी ही भेट घेतल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. या भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला आहे. सरडा रंग बदलतो पण ही नवीन प्रजाती मी पहिल्यांदाच पाहिली आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

 

“त्यांनी आरशात पाहिलं का? सरडा पण लाजेल. ते डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाहीत. हे डरपोक लोक आहेत. त्यांनी थोडीतरी लाज बाळगावी,” असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं आहे.