संत्र्याचा केक कधी खाल्लाय का ? घरच्याघरी ट्राय करा ;बनवायला सोपे आणि चविष्ट

0
10

घरात संत्री दिसली मग म्हटलं संत्र्याचा अप साईड डाऊन केक करून बघावा…. चव इतकी अप्रतिम लागतेय ना….. तुम्ही पण बघाच करून हा केक…..

घटक
• ४५ मिनिटं
• ४ जण
• १ टेबल स्पून बटर
• २ टेबल स्पून साखर
• १ कप मैदा
• १ टीस्पून बेकिंग पावडर
• १/२ टीस्पून बेकिंग सोडा
• चिमूटभर मीठ
• १/२ कप कोमट दूध
• १/२ टेबल स्पून व्हिनेगर
• १/४ कप तेल
• १/२ कप साखर
• १/४ कप संत्र्याचा रस
• १ टीस्पून ऑरेंज झेस्ट
• केशरी रंग (ऐच्छिक)

कुकिंग सूचना

1. केक टीन ला grease करून घ्यावे.
2. पॅनमध्ये 1tbsp बटर गरम करून त्यात 2tbsp साखर विरघळून कॅरमेल झालं की लगेच केक टीन मध्ये spread करावे.
3. संत्र्याच्या स्लाइसचा मधला भाग काढून केक टीन मध्ये रचाव्या..मध्ये चेरी/चोकलेट/टुटी फ्रुटी ठेवावी. ओवन १८०°c ला preheat करावा.

4. आता एका भांड्यात तेल(वास नसलेले कोणतेही), साखर, कोमट दूध+ विनेगर घालून चांगले मिक्स करावे.

5. आता चाळणीत मैदा, बेकिंग पाउडर, बेकिंग सोडा व चिमूटभर मीठ घेऊन चाळावे… व वरील मिश्रणात घालून मिक्स करावे, खूप जास्त फेटू नये…

6. हे मिश्रण केकटीन मध्ये ओतून टीन एकदोन वेळा (आपटावा) tap करावा.
7. केकटीन प्रिहीट ओवनमध्ये २५-३० मिनिटे बेक करावा. बेक झाल्यावर केक टिन काढून त्यावर कपडा घालून झाकून ठेवावा, थंड झाल्यावर डिशमध्ये डीमोल्ड करा. मस्त कापून सर्व्ह करा, तयार आहे अपसाईड डाऊन संत्रा केक….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here