साताऱ्यातही फसवणूक! बायकोचे वेगवेगळे 28 फोटो काढून भरले लाडक्या बहिणीचे अर्ज

0
456

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (CM Ladki Bahin Yojna) ही योजना कनिष्ठ वर्गातील महिलांना डोळ्यासमोर ठेवून केली आहे. मात्र या योजनेचा काही जण चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत. साताऱ्यातील किस्सा सांगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सभागृहात हशा पिकवला. अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोकणात आहे. यावेळी ते बोलत होते. तसेच फसवणूक करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवून जेलमध्ये चक्की पिसायला लावणार, असा इशारा देखील अजित पवारांनी यावेळी दिला आहे.

अजित पवार म्हणाले, सातारा जिल्ह्यात एक पठ्ठ्या असा निघाला की त्याने बायकोचे वेगवेगळे 28 फोटो काढले. एक पँट शर्ट, एक सहावारी, नववारी, लांब केस, मोठे केस असे फोटो काढले आणि 28 त्रिक पैसे बायकोच्या खात्यावर घेतली. लगेच आम्हाला कॉम्पुटरवर कळलं आम्ही लगेच त्याला पकडला. कोणीही चुकीचं काम करायचं नाही नाहीतर मग चक्की पिसिंग चक्की पिसींग करायला लावणार आहे.

सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना काय कळणार गरिबांची परिस्थीती? अजित पवारांचा सवाल
लाडकी बहीण योजना टीकेवर काही लोकं चेष्टा करतात की दीड हजार रुपयात काय होणार? अरे तुम्हाला सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना काय कळणार गरिबांची परिस्थीती? एका महिलेने दीड हजार रूपयांच्या राख्या विकत घेतल्या. त्या महिलेने राख्या विकल्या त्यातून तिला 20 हजार रुपये मिळाले. आता विरोधी पक्षातील एकजण म्हणाला की लाडक्या बहीण योजनेचे पैसे बंद करा… तुझ्या काय पोटात दुखतय… तुला काय कळणार गरिबाच दुःख, असे अजित पवार म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here