धक्कादायक! भरधाव बस पलटी झाल्याने तब्बल 44 प्रवाशी जखमी,पहा व्हिडीओ

0
494

उत्तर प्रदेशातील सोनभद्र भागातील रॉबर्टसगंज परिसरात एक भरधाव बस पलटी झाली. या बसमधील ४४ प्रवाशी जखमी झाले. हा अपघात छत्तीसगडहून बिहार येथे गया येथे जात असताना मार्कुंडी खोऱ्यात घडला. हा अपघात भीषण होता. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून बस रस्त्यावरून हटवण्याचे प्रयत्न सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक खासगी बस छत्तीसगडहून बिहार येथे जात असताना अचानक बस पलटी झाली. हा अपघात शुक्रवारी झाला. या अपघातात प्रवाशी गंभीर जखमी झाले. बसमध्ये 65 प्रवासी प्रवास करत होते आणि त्यापैकी 44 जण जखमी झाले आहेत. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. ही घटना मार्कुंडी खोऱ्यात घडली. अपघातात एका व्यक्तीने जीव गमावला आहे. अपघाताची माहिती पोलिसांनी कुटुंबियांना देण्यात आली.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना अपघातग्रस्त बसमधून बाहेर काढले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. अथक प्रयत्नांनतर पोलिसांनी वाहतूक सेवा सुरळीत केली.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here