परदेश शिष्यवृत्ती योजनेकरिता अर्ज करण्याचे आवाहन

0
110

माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परदेशात शिक्षण घेणाऱ्या विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील शिक्षण घेणाऱ्या पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्ती योजनेकरिता अर्ज करावेत. अर्ज दि. 17 मे 2025 सायंकाळी 6.15 वाजेपर्यत समक्ष किंवा पोस्टाने इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे येथे सादर करायचे आहेत. यासाठी अनुदानित, विनानुदानित व कायम विनाअनुदानित अशा सर्व विद्यालये/महाविद्यालये यांनी कार्यवाही करावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक ज्ञानेश्वर खिलारी यांनी केले आहे.

 

विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पीएच डी या अभ्यासक्रमासाठी QS (Quacquarelli Symonds) Ranking 200 च्या आतील असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल अथवा प्रवेश घेतील अशा 75 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी परदेश शिष्यवृत्ती या योजनेकरिता अर्ज करता येईल. जास्तीत जास्त विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी www.maharashtra.gov.in किंवा https://obcbahujankayan.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून अर्जाचा नमुना, शासन निर्णय या बाबत दिलेल्या माहिती पहावी, असे इतर मागास बहुजन कल्याण सांगली च्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here