ब्रेकिंग : आटपाडी : शेटफळे येथे अपघातात एकजण ठार

0
6

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे दुचाकी गाडीने डमडमला धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील युवक जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ३१ रोजी सायंकाळी ६.०० च्या दरम्यान घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शेटफळे ता.आटपाडी येथे गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वीच सतीश भगवान गायकवाड यांच्या चायनीजच्या गाड्यावर आचारी काम करण्यासाठी सुरेंद्र सिंग (वय 37) रा. बिहार हा आला होता. आज दिनांक ३१ रोजी सायंकाळीच्या दरम्यान, गाड्यावरून काम करून तो मालक सतीश गायकवाड यांच्या घरी आंघोळ करण्यासाठी निघाला होता.
तो दुचाकीवरून घराकडे निघाला असता गाड्यापासून अवघ्या १०० ते १०० मीटर अंतरावर त्याच्या दुचाकीची धडक डमडमला बसली.

धडक इतकी जोरदार होती की, त्यामध्ये जागी तो रक्ताच्या धारोळ्यात पडला. अपघाता नंतर त्याला तातडीने आटपाडी येथे पुढील उपचारासाठी नेण्यात येते होते. परंतु वाटेतच तो मयत झाला. ग्रामीण रुग्णालय आटपाडी येथे त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here