आटपाडी : स्व. रामभाऊ पाटील यांच्या पुण्यस्मरण निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

0
8

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडीचे मा.जि.प, सदस्य स्व.रामभाऊ पाटील यांच्या नवव्या स्मरणार्थ 1 जून रोजी आटपाडी येथील कलेश्वर सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आटपाडी शहराच्या राजकीय सामाजिक सहकारी त्यांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली. विकास सोसायटी चेअरमन, आटपाडी ग्रामपंचायत सरपंच, सांगली जिल्हा परिषद सदस्य म्हणून स्व.रामभाऊ पाटील यांनी काम केले.

2015 साली त्यांची त्यांचे अकाली निधन झाले. त्यानिमित्त रक्तदानाने आपल्या नेतृत्वाला अभिवादन करण्याचा हा उपक्रम सातत्याने दरवर्षी राबविला जात असून या पवित्र कार्यास तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भारत पाटील यांनी केले आहे, स्व. रामभाऊ पाटील युवा मंच, स्व. लोकनेते रामभाऊ पाटील स्मृती प्रतिष्ठान, भारत दादा युवाशक्ती, सौरभ पाटील युथ फाऊंडेशन, पदाधिकारी व कार्यकर्ते हा विधायक उपक्रम राबवत असून चालू वर्षीही कलेश्वर सभागृहात स्वर्गीय रामभाऊ पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदान शिबिरास मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here